राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा स्थगित

0
8

आपला अयोध्या दौरा स्थगित केल्याची माहिती खुद्द मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीच काल ट्विटरवरुन दिली. पुण्यातील सभेमध्ये आपण यावर सविस्तर बोलणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. राज ठाकरेंची तब्येत ठीक नसल्याने हा दौरा रद्द करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

राज ठाकरे हे अचानक पुणे दौर्‍यावर मुंबईला परतल्यापासूनच त्यांच्या अयोध्या दौर्‍याबद्दल चर्चांना उधाण आले होते. अखेर काल या चर्चांना पूर्णविराम देत त्यांनी दौरा स्थगित झाल्याच्या वृत्तावर शिक्कामोर्तब केले. राज ठाकरेंच्या अयोध्या दौर्‍याला भाजप खासदार ब्रिजभूषण सिंग यांचा तीव्र विरोध होता. उत्तर भारतीयांची माफी मागा आणि मगच अयोध्येला या अशी भूमिका ब्रिजभूषण सिंग यांनी घेतली होती; मात्र आता प्रकृतीसंदर्भातील कारणामुळे तुर्तास राज ठाकरेंचा हा दौरा रद्द झाला आहे.