राज्यात 24 तासांत नवे 88 कोरोना रुग्ण

0
6

राज्यात चोवीस तासांत नवीन 88 कोरोनाबाधित आढळून आले असून, 5 रुग्णांना इस्पितळात दाखल करण्यात आले. राज्यात कोरोनाबाधित आढळून येण्याचे प्रमाण 13.4 टक्के एवढे आहे. राज्यातील कोरोना सक्रिय रुग्णसंख्या 512 एवढी झाली आहे. चोवीस तासांत आणखीन 652 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. दरम्यान, आणखी 90 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.