राज्यात ४७६ नवे कोरोना रुग्ण

0
369

>> दोघांचा मृत्यू, बळींची संख्या ९३, एकूण रुग्णसंख्या १०,९७०

राज्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असून काल नवे ४७६ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. कोरोना पॉझिटिव्ह आणखी २ रुग्णांचा मृत्यू झाल्याने राज्यातील कोरोना बळींची संख्या ९३ झाली आहे. सध्याच्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ३७२० झाली आहे. राज्यातील कोरोना पॉझिटिव्ह एकूण रुग्णसंख्या अकरा हजाराच्या जवळ येऊन ठेवली आहे. एकूण रुग्णांची संख्या १०,९७० झाली असून त्यातील ७,१५७ रुग्ण बरे झाले आहे. आरोग्य खात्याने कोरोनाबाधित २४५ रुग्ण बरे झाल्याचे शुक्रवारी जाहीर केले.

दोघांचा मृत्यू
मंडूर येथील ४५ वर्षीय पुरुष रुग्णाचे मडगाव कोविड रुग्णालयात तर साखळी हाउसिंग बोर्डमधील ४९ वर्षीय पुरुष रुग्णाचे गोमेकॉत निधन झाले.

पणजीत नवे १८ रुग्ण
पणजी महानगरपालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ सुरूच आहे. नवे १८ कोरोना रुग्ण शुक्रवारी आढळून आल्याने कोरोना रुग्णांची एकूण संख्या १८८ वर झाली आहे. आल्तिनो ४, मार्केटजवळील राधा बिल्डिंगमध्ये ७, मिरामार ३, सांतईनेज, करंजाळे, बॉक द व्हॉक येथे प्रत्येकी १ रुग्ण आढळला.
पणजी वाहतूक पोलीस विभागाचा एक अधिकारी पॉझिटिव्ह आढळून आला.

श्रीपाद नाईक इस्पितळात
कोरोनाची बाधा झालेल्या आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांना दोनापावल येथील एका खासगी इस्पितळात काल दाखल केले आहे.