राज्यात पणजी सर्वात प्रदूषित शहर

0
20

राज्यातील 6 शहरांपैकी राजधानी पणजी शहराच्या हवेचा दर्जा हा सर्वात खराब असून, पणजी हे राज्यातील सर्वात प्रदूषित शहर असल्याचे गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने आपल्या अहवालात म्हटले आहे. राज्यातील 19 नॅशनल एअर मॉनिटरिंग प्रोग्राम स्टेशनवरून मिळालेल्या ॲम्बियंट एअर क्वालिटी मॉनिटरिंग डेटावरून प्रदूषण नियंत्रण मंडळाने राजधानी पणजीतील हवेचा दर्जा हा सर्वात खराब असल्याचे स्पष्ट केले आहे. एप्रिल 2022 ते मार्च 2023 ह्या काळात केलेल्या तपासणीच्या आधारावरून मंडळाने ही माहिती दिली आहे.