राज्यात नवे १२५ कोरोनाबाधित

0
17

राज्यात गेल्या चोवीस तासांत नवीन १२५ कोरोनाबाधित आढळून आले असून, एका कोरोनाबाधिताला इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. राज्यातील सक्रिय रुग्णसंख्या १०३३ एवढी झाली असून, कोरोनाबाधित आढळून येण्याचे प्रमाण १०.३२ टक्के एवढे आहे.

गेल्या चोवीस तासांत नवीन १२११ जणांच्या स्वॅबचे नमुने तपासण्यात आले. त्यातील १२५ जणांना कोरोना संसर्ग झाल्याचे आढळून आले.

तसेच मागील चोवीस तासांत आणखी १०९ जण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.०४ टक्के एवढे आहे. दरम्यान, राज्यातील कोरोना बळींची एकूण संख्या ३८३८ एवढी आहे.