राज्यात कोरोनाचे नवे ९२ रुग्ण

0
15

राज्यात गेल्या चोवीस तासांत नवीन ९२ कोरोनाबाधित आढळून आले आहेत. राज्यातील सक्रिय रुग्ण संख्या ७६८ एवढी झाली असून कोरोनाबाधित आढळून येण्याचे प्रमाण ९.४७ टक्के एवढे आहे. गेल्या चोवीस तासांत नवीन ९७१ जणांच्या स्वॅबचे नमुने तपासण्यात आले. त्यातील ९२ नमुने बाधित आढळून आले आहेत. चोवीस तासांत एकाही बाधिताला इस्पितळात दाखल करण्यात आलेले नाही. राज्यातील कोरोना बळींची एकूण संख्या ३८४५ एवढी आहे. आणखी ९० जण कोरोनामुक्त राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी दुसर्‍या बाजूने रुग्ण बरे होण्याचे प्रमाण चांगले आहे. चोवीस तासांत आणखी ९० जण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.१६ टक्के एवढे आहे.