कोरोना लसीकरणाचा २०० कोटींचा टप्पा पार

0
7

जगासह भारतातही कोरोना विषाणूचा फैलाव सुरुच आहेत. मात्र रुग्णांच्या संख्येत चढउतार दिसून येत आहेत. कोरोना विषाणूवर सरकारकडून देशव्यापी कोरोना लसीकरणाची मोहीम राबवली जात आहे. या पार्श्वभूमीवर भारताने काल दि. १७ रोजी एक महत्त्वपूर्ण व मोठा विक्रम रचला आहे.

देशव्यापी लसीकरणात भारताने २०० कोटी कोरोना प्रतिबंधात्मक लशींचा टप्पा पूर्ण केला आहे. देशात ५४८ दिवसांमध्ये कोरोना लशींचे २०० कोटींहून डोस देण्यात आले आहेत. शनिवारी देशभरात २५.२ लाखांहून अधिक लशी टोचण्यात आल्या होत्या. त्यानंतर रविवारी सकाळी १.३ लाख डोससह भारताने लसीकरणाच्या बाबतीत २०० कोटींचा टप्पा ओलांडला आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी, केवळ १८ महिन्यांमध्ये भारताने २०० कोटी कोरोना लशींचा टप्पा पूर्ण केला आह अशी माहिती दिली. देशात १६ जानेवारी २०२१ पासून लसीकरणाला सुरुवात करण्यात आली होती.