राज्यात एका बळीसह नवे ८९ कोरोनाबाधित

0
55

राज्यात चोवीस तासात आणखी एका कोरोना बळीची नोंद काल झाली असून, नवीन ८९ कोरोनाबाधित आढळून आले आहेत. त्यापैकी ७ रुग्णांना इस्पितळात दाखल करण्यात आले. राज्यातील सक्रिय रुग्णसंख्या ६९७ एवढी झाली आहे. कोरोना बळींची एकूण संख्या ३८४८ एवढी झाली आहे. चोवीस तासांत नवीन १३२७ स्वॅबच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली. राज्यातील कोरोनाबाधित आढळून येण्याचे प्रमाण ६.७० टक्के एवढे आहे. राज्यात आणखी ११६ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.१९ एवढे आहे.