राज्यात आणखी एक कोरोना पॉझिटिव्ह

0
167

>> रुग्णांची संख्या 6 वर

राज्यातील कोरोना रूग्णांच्या संख्येत आणखीन एका कोरोना रूग्णाची भर पडली असून कोरोना रूग्णांची संख्या आता 6 झाली आहे.
विदेशातून आलेल्या पेडणे तालुक्यातील मांद्रे भागातील एका व्यक्तीला कोरोनाची बाधा झाल्याचे चाचणीत स्पष्ट झाले आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांनी दिली.
ही कोरोनाबाधित व्यक्ती मोझांबिक, केनिया या देशातून गेल्या 19 मार्च 2020 रोजी डोमेस्टिक फ्लाईटने मुंबईमार्गे गोव्यात आली होती. ही व्यक्ती स्वतः इस्पितळामध्ये दाखल झाली होती. या व्यक्तीची करण्यात आलेली तपासणी पॉॅझिटीव्ह आढळून आली आहे. या कोरोनाबाधित रूग्णाची रवानगी मडगाव येथील कोरोना इस्पितळामध्ये करण्यात आली आहे. या व्यक्तीच्या संपर्कातील व्यक्तींना क्वारंटाईन करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे, अशी माहिती मंत्री राणे यांनी दिली.
दरम्यान, गोमेकॉच्या कोरोना आयसोलेशन वॉर्डात उपचार सुरू असलेल्या  मडगाव भागातील 50 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. या मृत व्यक्तीचा कोरोना विषाणू अहवाल नकारात्मक आहे. हा रूग्ण सीओपीडीने ग्रस्त होता, अशी माहिती आरोग्यमंत्री राणे यांनी दिली.