राज्यातील चार अपघातांत एकाचा मृत्यू, 16 जखमी

0
4

राज्यात काल रविवारी दिवसभारत चार अपघात झाले. या चार अपघातात एकूण 16 जण जखमी झाले असून पर्वरीतील अपघातात एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

शिरोड्यात कदंबला अपघात
11 प्रवासी जखमी

काल शिरोडा येथे कदंब बसने रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडाला धडक दिली. या अपघातात कदंब चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बसने रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडाला धडक दिली. यावेळी बसमधील चालक व वाहकासह 11 प्रवासी जखमी झाले.

पर्वरीत पर्यटक टॅक्सी चालक ठार

पर्वरी महामार्गावर उत्तररात्री झालेल्या अपघातात पर्यटक टॅक्सी चालकाचा मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे रविवारी दि. 17 रोजी उत्तररात्री 3.23 वाजता पर्वरी महामार्गावरील गौरी पेट्रोल पंपासमोर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या आयशर ट्रकला (जीए 04 टी 6732) म्हापशाहून पणजीला येणाऱ्या वॅगन- आर या (जीए 07 एफ 3990) पर्यटक टॅक्सीने मागून जोरात धडक दिली. या अपघातात टॅक्सी चालक संतोष हनुमंतप्पा हरिजन (29, रामनगर, बेती, मूळ रा. बेळगाव) याचा जागीच मृत्यू झाला. ट्रकचालकाचे नाव केशव आनंद नाईक (कुडाळ, महाराष्ट्र) असून पोलीस त्याची चौकशी करीत आहेत.