राजू श्रीवास्तव यांचे दिल्लीत निधन

0
5

आपल्या खुसखुशीत विनोदांनी प्रेक्षकांना भुरळ घालणारे राजू श्रीवास्तव यांचे बुधवारी सकाळी निधन झाले. ते ५८ वर्षांचे होते. दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याची माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिली.

हृदयविकाराचा झटका आल्यानंतर १० ऑगस्टपासून त्यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना व्हेंटिलेटर ठेवण्यात आले होते. गेल्या महिनाभरापेक्षा अधिक काळ त्यांची रुग्णालयात मृत्यूशी झुंज सुरू होती. राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी, यासाठी देशभरातील आणि विदेशातील त्यांचे चाहते प्रार्थना करत होते; पण काल अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनामुळे सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.