गोठणीचाव्हाळ-कोलवाळ येथील श्री गणेशनगरी येथे काल सायंकाळी ७ वा. च्या दरम्यान रंगपंचमी दिवशी गालाला रंग लावल्याच्या कारणास्तव दोन धर्मियांच्या गटात वाद उफाळला. त्यातून महेश सुरेश गावकर याच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. म्हापसा पोलिसांनी सध्या तिघांना ताब्यात घेतले.
याची माहिती मिळताच म्हापसा पोलीस निरीक्षक तुषार लोटलीकर, पेडणे पोलीस निरीक्षक संदेश चोडणकर, साळगाव पोलीस निरीक्षक मिलिंद भुईबर तसेच पोलीस उपनिरीक्षक अनिल पोवळेकर, आशिष परब व इतर पोलीस कॉन्स्टेबल व इतर घटनास्थळी गेले व तेथील जमाव पांगवला. याबाबत माहितीनुसार रंगपंचमी खेळत असताना एका गटाकडून विरोधी गटातील दोघांना रंग लावला. त्यावर त्यांनी शिव्या देण्यास सुरवात केली व आणखी आठ दहा जणांना दांडे घेऊन बोलावून घेतले व तेथील वातावरण तापले.