गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने एप्रिल २०२२ मध्ये घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल येत्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. शिक्षण मंडळाने बारावीचा निकाल २१ मे रोजी जाहीर केला होता. त्यावेळी दहावीचा निकाल पुढील आठवड्यात जाहीर करण्यात येईल, असे सांगितले होते. मात्र मे महिन्याच्या चौथ्या आठवड्यात दहावीचा निकाल जाहीर करण्यात आलेला नाही.