>> युरी आलेमाव यांचे जोरदार टीकास्त्र
काँग्रेस पक्षाचा शानदार विजय आणि भाजपच्या कर्नाटकातील दारुण पराभवाने गोव्यातील भाजप नेत्यांना आता जाग आली असून, कर्नाटकच्या कळसा-भांडुरा प्रकल्पाला मंजूर केलेला डीपीआर बेकायदेशीर असल्याचा साक्षात्कार गोव्यातील भाजप नेत्यांना झाला आहे. या भाजप नेत्यांनी आता मगरीचे अश्रू ढाळणे थांबवावे आणि सदर डीपीआरला दिलेली परवानगी मागे घ्यावी, अशी मागणी केंद्रातील भाजप सरकारकडे करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केली आहे.
राज्यातील सरकार जर म्हादईप्रश्नी गंभीर असेल तर या सरकारने दिल्लीतील ‘ट्रबल’ इंजिन सरकारवर कळसा-भांडुरा प्रकल्पाच्या डीपीआरला दिलेली मान्यता मागे घेण्यासाठी आणि स्थिती जैसे थे ठेवण्यासाठी दबाव आणावा, अशी मागणी त्यांनी
केली.