मोरजी येथे 2.60 लाखांचे ड्रग्ज जप्त, एका संशयितास अटक

0
3

गोवा पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने मोरजी येथे छापा घालून एका व्यक्तीला अटक करून त्याच्याकडून 2.60 लाख रुपयांचा अमलीपदार्थ जप्त केला आहे. या प्रकरणी अटक केलेल्या संशयिताचे नाव समीर सोपटे (35 वर्षे) असे आहे. पोलिसांनी गांजा व इतर अमलीपदार्थ हस्तगत केला. तसेच, संशयिताकडील दुचाकी वाहन जप्त केले आहे.