मोरजी येथे १.६५ कोटींची अमली पदार्थांची झाडे जप्त

0
106

>> रशियन नागरिकास अटक

पेडणे पोलीस निरीक्षक संदेश चोडणकर यांच्या नेतृत्वाखाली रविवारी सकाळी ६.५० वाजता मरडीवाडा मोरजी येथे छाप्यात कनाबिस ही अमली पदार्थांची झाडे जप्त केली त्यांची बाजारात १ कोटची ६५ लाख एवढी किंमत असून या प्रकरणी पोलिसांनी रशियन नागरिकत्व असलेले वेस्ली राकमानव्ह (३४) याला अटक केली.
मरडीवाडा मोरजी येथे ७१४/ए हे घर भाडेपट्टीवर घेऊन एक रशियन नागरिक राहत होता. या घराच्या गच्चीवर त्याने अमली पदार्थांच्या झाडांची लागवड केल्याची माहिती खास सूत्रांकडून मिळाली. त्यानंतर रविवारी सकाळी सापळ रचून या घरावर सकाळी ६.५० वाजता पोलिसांनी छापा टाकला. त्यात घराच्या गच्चीवर कनाबिस या अमली पदार्थांच्या झाडांची लागवड केलेली आढळून आली. हा सर्व माल जप्त करत रशियन नागरिक वेस्ली याला अटक करण्यात येऊन त्याच्याविरोधात गुन्हा नोंद केला आहे. पेडणे पोलिसांची अमली पदार्थप्रकरणी आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई आहे.