मोन्सेर्रात यांच्यावरील खटल्याची जूनपासून नियमित सुनावणी

0
7

राज्याचे महसूल मंत्री बाबुश मोन्सेर्रात यांच्याविरोधातील बलात्काराच्या खटल्याच्या कामाला गती देण्याचा निर्णय मडगाव येथील विशेष न्यायालयाने घेतला आहे. येत्या जून महिन्यापासून या बलात्काराच्या खटल्याची सुनावणी आठवड्याला तीन वेळा घेण्याचा निर्णय विशेष न्यायालयाने घेतला आहे. या बलात्कार खटल्याच्या सुनावणीला गती देऊन हा खटला जलदगतीने हातावेगळा करता यावा, यासाठी मडगाव येथील विशेष न्यायालयाने हा निर्णय घेतला आहे.

बाबुश मोन्सेर्रात यांच्यावर त्यांच्याच कार्यालयात काम करणाऱ्या एका मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे.
दरम्यान, मोन्सेर्रात यांनी या खटल्याच्या सुनावणीच्या वेळी आपणाला न्यायालयात हजर राहण्यापासून कायम सवलत देण्यात यावी यासाठी न्यायालयात अर्ज केला आहे. या अर्जावर पुढील शुक्रवारी सुनावणी होणार आहे.