मेघना सावर्डेकर हिचा अटकपूर्व जामीन मंजूर

0
18

बाणस्तारी येथे भीषण अपघातातील मर्सिडीज कारची मालक मेघना सिनाई सावर्डेकर हिला अखेर काल फोंडा येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला.
मेघा सावर्डेकर हिच्या अटकपूर्व जामिनासाठीच्या अर्जावर काल सुनावणी झाली. अपघात प्रकरणी तपासकामासाठी स्थापन केलेल्या विशेष तपास पथकाचे प्रमुख पोलीस अधीक्षक निधीन वाल्सन व पोलीस निरीक्षक सूरज हळर्णकर यावेळी उपस्थित होते. या अपघाताला जबाबदार ठरलेली मर्सिडीज कार परेश सिनाई सावर्डेकर हेच चालवत होते, अशी जबानी फोंडा प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर दिली होती. त्यामुळे काल मेघना सावर्डेकर हिचा अटकपूर्व जामीन मंजूर झाला. दरम्यान, या अपघात प्रकरणातील प्रमुख संशयित परेश सावर्डेकर याला गुरुवारीच जामीन मंजूर झाला होता.