मृत कामाक्षीच्या फ्लॅटमध्ये फॉरेन्सिक टीमचा पंचनामा

0
6

संपूर्ण राज्यात गाजत असलेल्या कामाक्षी उद्दापनावर या महिलेच्या खूनप्रकरणी संशयित प्रकाश चुंचवाड याला पर्वरी पोलिसांच्या साहाय्याने फॉरेन्सिक टीमने कामाक्षी राहात असलेल्या सोलसेन अपार्टमेंटमध्ये जाऊन फ्लॅटची तपासणी करून पंचनामा केला.
यावेळी फॉरेन्सिक अधिकारी आणि पोलीस उपस्थित होते. कामाक्षीवर याच फ्लॅटमध्ये प्रकाशने चाकूने एकूण 35 वार करून तिचा निर्घृण खून केला आणि नंतर मित्राच्या मदतीने मृतदेह आंबोलीतील घाटात तिचा मृतदेह फेकून दिला होता. पर्वरी पोलिसांनी तत्पर कामगिरी करून चौकशीअंती प्रकाश आणि त्याचा मित्र निरुपदी यास जेरबंद केले होते. न्यायालयाने दोघांनाही दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. तपासाचा एक भाग म्हणून संशयित आरोपी प्रकाश याला कामाक्षीच्या फॉरेन्सिक टीमसह नेऊन तपास केला. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करीत आहेत.