माजी कायदा मंत्री शांती भूषण यांचे निधन

0
12

भारताचे माजी कायदा मंत्री आणि ज्येष्ठ वकील शांती भूषण (97) यांचे काल निधन झाले. मागील बऱ्याच दिवसांपासून ते आजारी होते. ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांचे ते वडील होत. शांती भूषण हे वकिलीशिवाय राजकारणातही चर्चेतील नाव होते. त्यांनी काँग्रेस आणि जनता पार्टीच्या माध्यमातूनही राजकारणात स्वत:ला आजमावले होते.