महाराष्ट्र विधान परिषदेवर उद्धव ठाकरे बिनविरोध

0
132

 

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व अन्य ८ जणांची महाराष्ट्र परिषदेवर बिनविरोध निवड झाल्याचे काल जाहीर करण्यात आले. ठाकरे यांच्या व्यतिरिक्त शिवसेनेच्या नीलम गोर्‍हे व भाजपचे राजसिंह मोहिते पाटील, गोपिचंद पडळकर, प्रवीण दटके व रमेश कराड यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. काल गुरुवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली. या निवडीमुळे ५९ वर्षीय ठाकरे आता विधान परिषद सदस्य म्हणून कामकाज करणार आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून २८ नोव्हेंबर रोजी सूत्रे हाती घेतलेल्या ठाकरे यांना २७ मे पूर्वी विधानसभा किंवा विधान परिषदेवर निवडून येणे आवश्यक होते.