महाराणी एलिझाबेथ यांना अखेरचा निरोप

0
9

ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांना काल अखेरचा निरोप देण्यात आला. किंग जॉर्ज चतुर्थ मेमोरियल चॅपलमध्ये ब्रिटिश प्रमाणवेळेनुसार काल सायंकाळी ७.३० च्या सुमारास त्यांचे पार्थिव दफन करण्यात आले. महाराणी एलिझाबेथ यांना त्यांचे पती प्रिन्स फिलिप यांच्या समाधीच्या शेजारी दफन करण्यात आले. तत्पूर्वी, त्यांच्या अंत्यदर्शनासाठी जगभरातील दिग्गन नेत्यांनी हजेरी लावली होती. भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांच्यासह अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन व अन्य नेत्यांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले.

ब्रिटिश प्रमाणवेळेनुसार काल सकाळी ११ वाजता राजकीय शोकसभा झाली. यावेळी वेस्टमिन्स्टर ऍबे येथे विविध देशांच्या प्रतिनिधींनी एलिझाबेथ यांचे अंतिम दर्शन घेतले. शवपेटीत त्यांचे पार्थिव ठेवल्यानंतर ते बाहेर आणण्यात आले. तेथून ते वेलिंग्टन आर्क येथे आणण्यात आले. त्यानंतर त्यांचे पार्थिव विंडसर कॅसल येथे आणून ते किंग जॉर्ज चतुर्थ मेमोरियल चॅपलमधील रॉयल वॉल्टमध्ये ठेवण्यात आले. या ठिकाणी अंत्यविधीशी एक प्रक्रिया पार पडली. त्यानंतर किंग चार्ल्स तृतीय यांनी त्यांचे अंत्ययात्रेत सहभागी लोकांचे आभार मानले.