मणिपूर हिंसाचार : अखेर पंतप्रधानांंनी घेतली बैठक

0
7

आरक्षणावरून मणिपूरमधील कुकी आणि मैतेई समुदायांमध्ये गेल्या 54 दिवसांपासून हिंसाचार सुरू असून, या हिंसाचारात आतापर्यंत 131 जणांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर अखेर काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांना मणिपूरमधील सद्य:स्थितीची माहिती दिली. या बैठकीला केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमण, हरदीप पुरी, गृहमंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.