मणिपूरमध्ये पुन्हा उफाळला हिंसाचार

0
2

मणिपूरमध्ये काल पुन्हा एकदा हिंसाचाराची घटना घडली. सोमवारी मणिपूरची राजधानी इम्फाळच्या न्यू लाम्बुलेन परिसरातील घरांना जमावाने आग लावली. त्यानंतर लष्कर आणि निमलष्करी दल तैनात करण्यात आले. या घटनेनंतर मणिपूरमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच, 26 मेपर्यंत पाच दिवस इंटरनेटही बंद करण्यात आले आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याजवळून दोन हत्यारे ताब्यात घेतली आहेत.