मणिपूरचे मुख्यमंत्री बिरेन सिंह यांच्या राजीनाम्याच्या चर्चांना ऊत?

0
14

मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनी 16 तासांत दोनदा राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांची भेट घेतली. शनिवारी रात्री 8 वाजता त्यांनी राज्यपालांची भेट घेतली होती. ही बैठक सुमारे 30 मिनिटे चालली होती. त्यानंतर काल दुपारी बाराच्या सुमारास राज्यपालांची भेट घेण्यासाठी पोहोचले. याआधी बिरेन सिंह यांनी सीएम हाऊसमध्ये सर्व आमदारांचीही भेट घेतली होती. मणिपूरमधील हिंसाचाराच्या घटना सुरुच असल्याने बिरेन सिंह हे राजीनामा देऊ शकतात अशी चर्चा आहे. त्यांनी गेल्यावर्षी 20 जून रोजी राजीनामा देण्याच्या हालचाली चालवल्या होत्या. त्यानंतर निर्णय बदलण्यात आला होता.