मगोचे १० उमेदवार जाहीर

0
42

>> ढवळीकर बंधूंसह सावळ, झांटये, आरोलकर यांना उमेदवारी

मगोने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी १० उमेदवारांच्या नावांची घोषणा काल केली. मगोने आमदार सुदिन ढवळीकर, माजी आमदार तथा मगोचे अध्यक्ष दीपक ढवळीकर, माजी आमदार नरेश सावळ, भाजपमधून प्रवेश केलेले माजी आमदार प्रवीण झांट्ये यांना उमेदवारी दिली आहे.

मांद्रे मतदारसंघात जीत आरोलकर, पेडणे मतदारसंघात राजन कोरगावकर, डिचोली मतदारसंघात नरेश सावळ, मये मतदारसंघात प्रवीण झांट्ये, वाळपई मतदारसंघात विश्‍वेश प्रभू, प्रियोळ मतदारसंघात पांडुरंग ऊर्फ दीपक ढवळीकर, फोंडा मतदारसंघात डॉ. केतन भाटीकर, शिरोडा मतदारसंघात संकेत नाईक मुळे, मडकई मतदारसंघात रामकृष्ण ऊर्फ सुदिन ढवळीकर आणि सावर्डे मतदारसंघात विनायक ऊर्फ बालाजी गावस यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

मगोच्या आणखी काही उमेदवारांची नावे शनिवारी जाहीर केली जाणार आहेत, असे मगोपचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी स्पष्ट केले आहे.