भारतात लवकरच येणार नवीन ईव्हीएम मशीन

0
10

भारतात लवकरच नवीन प्रकारच्या ईव्हीएम मशीन येणार आहेत. या नव्या मशीनयाद्वारे मतदाराला देशात कुठेही बसून आपल्या मतदारसंघातील मतदान करता येणार आहे. या नवीन मशीन्स रिमोट व्होटिंग मशीन म्हणून ओळखल्या जातील. सध्या मतदानासाठी वापरल्या जाणाऱ्या ईव्हीएम मशिन्सपेक्षा ही नवीन मशिन्स आधुनिक असणार आहेत. ज्या नवीन ईव्हीएम मशिन येणार आहेत त्याच्या बॅलेट युनिटमध्ये फक्त ज्या भागात ही मशीन वापरली जाणार आहे त्या भागातील उमेदवारांच्या नावांची यादी असणार आहे. परंतु, नव्या डायनॅमिक ईव्हीएममध्ये डेटा गोळा करण्याची क्षमता जास्त असेल अशी माहिती निवडणूक आयोगाने दिली. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, 10,000 नव्या डायनॅमिक ईव्हीएम मशीन आणल्या जाऊ शकतात. देशातील प्रत्येक जिल्ह्यातील दुर्गम आणि शहरी भागात अशा 5-6 मशीन्स तैनात करण्यात येतील. शिवाय मोठ्या शहरांमध्ये देखील त्यांची संख्या प्रमाणानुसार वाढवली जाईल. निवडणूक आयोगाच्या नियोजन यशस्वी झाले तर 2024 च्या लोकसभा निवडणुकीआधी या नव्या मशीन येतील.