भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा उद्या गोव्यात

0
95

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा येत्या शुक्रवार २३ आणि २४ जुलै २०२१ रोजी गोवा दौर्‍यावर येणार आहेत.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची यापूर्वी एकदा गोवा भेट रद्द झाली आहे. गोव्यात २०२२ मध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. या निवडणुकीची रणनीती निश्‍चित करण्याचे काम दौर्‍यात केले जाणार आहे. राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा स्थानिक भाजप मंत्री, आमदार, पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्त्यांची भेट घेऊन त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.