भाजपची उमेदवारीसाठी निवड प्रक्रिया सुरू

0
11

>> ठिकठिकाणी कार्यकर्त्यांच्या बैठका

भाजपचा पणजी मतदारसंघातील उमेदवार ठरवण्यासाठी पक्षाने राज्य निवडणूक कार्यालयात गुप्त पद्धतीने मतदान घेतले. पणजीच्या भाजप गटाच्या अनेक प्रमुख कार्यकर्त्यांनी व पदाधिकार्‍यांनी या निवडणुकीत भाग घेतला. यावेळी पक्षाचे निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस व अन्य ज्येष्ठ भाजप नेते यावेळी उपस्थित होते. यावेळी कार्यकर्त्यांंना त्यांच्या आवडत्या उमेदवाराचे नाव चिठ्ठीत लिहिण्यास सांगण्यात आले होते.

यावेळी भाजपचे पणजीचे आमदार व उमेदवारीचे दावेदार बाबूश मोन्सेरात उपस्थित होते. मात्र अन्य एक दावेदार उत्पल पर्रीकर हे यावेळी हजर नव्हते.
किती मतदारांनी कुणाच्या बाजूने कौल दिला त्यानुसार पक्ष काय तो निर्णय घेणार आहे. अन्य काही मतदारसंघांसाठीही अशा प्रकारे गुप्त पद्धतीने मतदान घेण्यात आले.