गोवा पोलिसांच्या गुन्हा अन्वेषण विभाग, सायबर गुन्हा विभाग यांच्या सहकार्याने हैदराबाद पोलिसांनी हणजूण येथे बोगस कॉल सेंटर चालविणाऱ्या चौघांना काल अटक केली. संशयितांनी हैदराबाद येथे बोगस कॉल सेंटर सुरू केले होते. हैदराबाद पोलिसांना या बोगस कॉल सेंटरचा सुगावा लागल्याने संशयितांनी हणजूण येथे कॉल सेंटर सुरू केले. या संशयितामध्ये कफिल अहमद, मोहम्मद झैनुल, मोहम्मद आसीफ आणि चिराग सोहनलाल यांचा समावेश आहे. हैदराबाद पोलिसांनी गोवा पोलिसांच्या सहकार्याने ही कारवाई केली.