बेरोजगारीची आकडेवारी अमान्य : मोन्सेरात

0
3

केंद्रीय मंत्रालयाने जाहीर केलेली बेरोजगारीची आकडेवारी राज्य सरकार स्वीकारत नाही. राज्यातील बेरोजगारांची यादी अचूक नाही. केंद्रीय मंत्रालयाने जाहीर केलेली बेरोजगारीची आकडेवारी राज्य सरकारने पाठविलेली नाही, असे स्पष्टीकरण कामगार व रोजगारमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी पत्रकारांशी बोलताना काल दिले.
केंद्रीय मंत्रालयाने बेरोजगारीबाबत जाहीर केलेल्या यादीत गोवा राज्य अव्वल स्थानी आहे. राज्यातील बेरोजगाराच्या प्रश्नी विरोधी पक्षाने राज्य सरकारवर जोरदार टीका चालवली आहे. यासंबंधीच्या प्रश्नावर बोलताना मोन्सेरात म्हणाले की, केंद्रीय मंत्रालयाने दिलेली आकडेवारी राज्य सरकारच्या कामगार विभागाने सादर केलेली नाही. राज्य सरकारच्या कामगार आयुक्तांनी नवी दिल्ली येथे संबंधित मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांशी बेरोजगारीच्या आकडेवारीबाबत चर्चा केली आहे. राज्य सरकारच्या नियोजन आणि सांख्यिकी विभागाने या प्रकरणाचा पाठपुरावा केला पाहिजे. केंद्रीय मंत्रालयाला राज्यातील बेरोजगारीबाबत अचूक माहिती सादर केली पाहिजे, असेही मंत्री मोन्सेरात यांनी सांगितले.