बेकायदा वास्तव्य केल्याप्रकरणी हणजूण पोलिसांनी युगांडाच्या तीन महिलांना काल अटक केली. वैध कागदपत्रांशिवाय भारतात राहिल्याच्या आरोपावरून नाकावोया शनिता (32), अमिनाह नाकायझा (28) आणि नासाका सुमाय्या (22) या तीन युगांडाच्या तीन महिलांना हणजूण पोलिसांनी अटक केली. पोलिसांच्या भाडेकरू तपासणी मोहिमेमध्ये तिन्ही महिला वैध कागदपत्रांशिवाय गोव्यात वास्तव्य करीत असल्याचे आढळून आले होते.

