बेकायदा चिरेखाण प्रकरणी २ पोलिसांची चौकशी सुरू

0
7

बेकायदा चिरेखाण प्रकरणी दोन पोलीस निरीक्षकांची खातेनिहाय चौकशी सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती गोवा पोलिसांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाला काल दिली.

न्यायालयात बेकायदा चिरेखाणीसंबंधीच्या एका जनहित याचिकेवर काल सुनावणी झाली. त्यावेळी गोवा पोलिसांनी राज्यातील बेकायदा चिरेखाण प्रकरणी कारवाईचा अहवाल सादर केला. कुळे पोलीस स्थानकाचे तत्कालीन पोलीस निरीक्षक प्रज्योत फडते आणि संजय दळवी यांची खातेनिहाय चौकशी सुरू करण्यात आली आहे. खाण खात्याकडून २३ तक्रारी दाखल करण्यात आल्या असून, सर्व तक्रारींची दखल घेण्यात आली आहे, असेही अहवालात म्हटले आहे.