बार्देश, डिचोली तालुक्या आज मर्यादित पाणीपुरवठा

0
18

अस्नोडा येथील ५० एमएलडी जलप्रक्रिया प्रकल्पावर तातडीचे विद्युत देखभालीचे काम हाती घ्यावयाचे असल्याने बुधवार दि. ४ मे रोजी बार्देश आणि डिचोली तालुक्यात मर्यादित पाणीपुरवठा केला जाईल. दरम्यान, काल देखील या दोन्ही तालुक्यात याच कारणास्तव मर्यादित पाणीपुरवठा करण्यात आला होता.