बसच्या धडकेत महिलेचा मृत्यू

0
22

बेतूल येथे काल सकाळी भरधाव जाणाऱ्या बसची धडक बसून एक ज्येष्ठ महिला ठार झाली. रोझारिना पेद्रू आंतोनियो सिमॉईश (65) असे मृत महिलेचे आहे. ती ओलीर, किटल-बेतूल येथील रहिवासी होती. काल सकाळी बेतूल येथून एक बस मडगावच्या दिशेने निघाली होती. त्याचवेळी तांकावाडो-बेतूल येथे रोझारिना ही रस्ता पार करीत असताना बसने तिला धडक दिली. त्यात ती खाली कोसळली व बसच्या चाकाखाली चिरडली गेली. तिला तात्काळ जिल्हा हॉस्पिटलात नेले असता, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. दरम्यान, ही बस विलेश लोटलीकर चालवित होता. त्याच्याकडे वाहन चालविण्याचा परवानाही नव्हता.