फोंडा ते भोम या चारपदरी महामार्गासाठी केंद्रीय रस्ता वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने 26,310 चौरस मीटर एवढी अतिरिक्त जमीन संपादित करण्यासाठी अधिसूचना जारी केली आहे. 16 एप्रिल रोजी अधिसूचना काढण्यात आली असून, त्यानुसार कुंडई, कुंकळ्ये, वेलिंग व प्रियोळ येथील जमीन राष्ट्रीय महामार्ग 748 साठी संपादित करण्यात येणार आहे. वरील अधिसूचना प्रसिद्ध झाल्यापासून 21 दिवसांच्या आत संबंधितांनी आपले आक्षेप लेखी स्वरूपात विशेष जमीन संपादन अधिकारी, सार्वजनिक बांधकाम खाते, राष्ट्रीय महामार्ग, आल्तिनो-पणजी येथे द्यावेत, असे कळवण्यात आले आहे.