फर्मागुडी येथे छाप्यात 14 लाखांचे ड्रग्ज जप्त

0
2

फोंडा पोलिसांनी फर्मागुडी येथे छापा घालून सुमारे 14 लाख 52 हजार 100 रुपयांचा अमलीपदार्थ जप्त केले आहेत. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. बुधाराम बिश्नोय (56) आणि जगदीश बिश्नोय (46) अटक केलेल्या संशयितांची नावे असून ते दोघेही राजस्थानचे रहिवासी आहेत. त्यांच्याकडे 145 ग्रॅम एमडीएमए हा अमलीपदार्थ आढळून आला असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. दरम्यान, जुने गोवा पोलिसांनी माडेल चोडण येथे छापा घालून सायमन ॲश्ली नामक विदेशी नागरिकाला अटक करून त्याच्याकडून अंदाजे 95 हजार रुपयांचा गांजा जप्त केला आहे.