पेडण्यातील अपघातात महिला ठार

0
6

पेडणे तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावर न्हयबाग जंक्शन येथे ट्रक आणि दुचाकीची समोरासमोर धडक होऊन अपघात घडला. त्यात दुचाकीवरील सुनीता राजाराम नाईक (50, रा. तोरसे) या महिलेचा मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, पंडिता नाईक हे आपला ट्रक (क्र. जीए-01-यू-2543) घेऊन महामार्गावर पोहोचताच मालपेहून पत्रादेवीच्या दिशेने जात असलेल्या दुचाकीला (क्र. जीए-04-के-6819) धडकला. त्याबरोबर दुचाकीचालक राजाराम नाईक (58) आणि मागे बसलेल्या त्यांची पत्नी सुनीता नाईक ह्या रस्त्यावर पडल्या. या अपघातात सुनीता नाईक या गंभीर जखमी झाल्याने त्यांना रुग्णालयात हलवण्यात आले, तेथे त्यांचा मृत्यू झाला.
पेडणे पोलिसांनी अपघाताचा पंचनामा करून या प्रकरणी गुन्हा दाखल केला. या अपघाताचा पंचनामा पोलीस निरीक्षक सचिन लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विवेक हळदणकर, एरिक फर्नांडिस, शशांक साखळकर यांनी केला.