पावसाने घेतली थोडी विश्रांती

0
16

सलग दोन दिवस राज्याला झोडपून काढल्यानंतर काल पावसाने थोडीशी विश्रांती घेतली. पावसाचे प्रमाण थोडे कमी झाल्याने नागरिकांनी सुस्कारा सोडला. दरम्यान, हवामान विभागाने येत्या ९ जुलैपर्यंत जोरदार पावसाची शक्यता काल व्यक्त करून ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. राज्यात पावसाने इंचाचे अर्धशतक काल पूर्ण केले असून, आत्तापर्यंत ५०.७९ इंच पावसाची नोंद झाली आहे. राज्यात चोवीस तासात ३.२८ इंच पावसाची नोंद आहे.