देशातील चौथा लॉकडाऊन दि. ३१ मे रोजी संपणार असून त्याच दिवशी पाचव्या लॉकडाऊनची घोषणा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रेडिओवर मन की बात ही कार्यक्रम होणार असून त्यावेळी ते देशवासियांशी संवादादरम्यान या संदर्भात माहिती देण्याची शक्यता आहे.
देशभरातील सध्या कार्यवाहीत असलेल्या निर्बंधांमध्ये कशा प्रकारे शिथिलता आणली जाणार आहे व अन्य माहिती ते देणार आहेत. दरम्यान केंद्रीय गृह मंत्रालयातील सूत्रांनुसीर लॉकडाऊन ५.० चा भर प्रामुख्याने देशातील कोरोनाचे एकूण ७० टक्के रुग्ण असलेल्या ११ शहरांवर देण्यात येणार आहे. १ जूनपासून लागू होणार्या या टप्प्यात दिल्ली, मुंबई, पुणे, बंगळुरू, ठाणे, इंदूर, चेन्नई, अहमदाबाद, जयपूर, सूरत व कोलकाता ही ती शहरे असतील.
काही अटींवर धार्मिक कार्यक्रमांसाठी धार्मिक स्थळे खुली करू दिली जाण्याची शक्यता आहे मात्र अशी वेळी मोठी गर्दी करू दिली जाणार नाही. तसेच मास्क घालणे, सामाजिक अंतर राखणे हे नियम पाळण्यावर कटाक्ष ठेवला जाणार आहे.