पसरतोय कोरोना, काळजी घ्या ना!

0
161
  • कु. समीक्षा नागेश शिरोडकर (मये- डिचोली)

 

शेवटी सांगते आम्ही जर घरी थांबलो, स्वतःबरोबर दुसर्‍यांचाही विचार केला तरच आम्ही आनंदाने, उत्साहाने जगू शकू व  आपल्याला पुढचे दिवस पाहायला मिळतील. 

 

कोरोना हा संसर्गजन्य रोग दिसामाजी पसरून त्याने लोकांना हतबल करून टाकले आहे. सर्वप्रथम या व्हायरसचे प्रमाण चीन देशातील वुहान भागात आढळले. त्यानंतर इटाली, ङ्ग्रान्स, स्पेन, ब्रिटन या देशात कोरोना वेगाने पसरला. आता तर महाराष्ट्रांत या रोगाचे रूग्ण गतीने सापडताहेत. या विषाणूपासून होणार्‍या आजाराला कोविड-१९ असे म्हणतात. तो गतीने पसरू नये म्हणून सरकारने १४४ कलम लागू केले. साधारणतः जगात आजपर्यंत १० लाख लोकांनी कोरोनाला तोंड दिले आहे. त्यातील जगभरातील पन्नास हजार लोकांना मृत्यु टाळता आला नाही.

कोरोना हा खूप भयानक व्हायरस आहे. दिवसातून दररोज ८०० -९०० नवीन रूग्ण सापडतात. त्यामुळे आम्ही सगळ्यांनीच आधीच काळजी घेतली पाहिजे. सर्व प्रसारमाध्यमांतून आम्हाला काळजी कशी घ्यावी… याविषयी सूचना दिल्या जातातच. रोज दोन दोन तासांनी हात- पाय स्वच्छ साबणाने धुवावे, वैयक्तिक जीवनात सॅनीटायजरचा वापर करावा, खोंकताना, शिंकताना तोंडावर रूमाल धरावा, गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये, अनोळखी लोकांपासून सावध रहावे. स्वच्छता बाळगावी आणि विवेकबुध्दीने विचार करावा. आम्ही जर बाहेर पडलो तर इतरांबरोबर दुसर्‍यांचेही आयुष्य आपण धोक्यात घालू याची जाणीव असणे गरजेचे. महत्वाचे म्हणजे घरातच सुरक्षित रहावे, घरातून विनाकारण बाहेर पडणे टाळावे. याची काळजी घेतली तरच कोरोना आमच्याकडे येणार नाही हे नक्की. कोरोना अतिशय गतीने पसरतो हे पाहून माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी पूर्ण देश २२ मार्चला बंद ठेवण्याचे आवाहन केले आणि त्यांना जनतेकडून पाठिंबाही मिळाला.

प्रधानमंत्र्यांच्या आदेशा नुसार गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना परिस्थिती पाहून लागोपाठ निर्णय घ्यावे लागले. शाळा, महाविद्यालयीन ते विद्यापीठ पर्यंत मुलांना सुट्या, दहावी, बारावीच्या परिक्षा चालू असताना टोकाचे निर्णय घ्यावे लागले, सरकारी, खाजगी आस्थापने, कारखाने, बँक, दुकाने, कौटुंबिक कार्यक्रम, लग्न, निवडणूका सगळ्याच पुढे ढकलण्यात आल्या. देवळे, मैदानी खेळ सगळेच  बंद ठेवण्यात आले. सगळीकडल्या  वाहतुक व्यवस्था सील करण्यात आल्या.

०३ मे पर्यंत सगळ्यांना घरामध्येच राहण्याचा आदेश दिला. तरच आम्ही या डोंगरी सावटातून स्वतःला व देशाला वाचवू इतकी भीषण परिस्थिती आली म्हणून टोकाचे निर्णय घ्यावे लागले.  प्रधानमंत्र्यांनी २१ दिवस व त्यानंतर आता १९ दिवसांपर्यंत पूर्ण देश १००%  लॉकडाऊन करण्यासाठी आवाहन केले. कोरोना पासून जर आम्हाला सावध व्हायचे असेल तर या सारख्या आव्हानांना आम्हाला तोंड द्यावे लागणार.. याची तयारी आम्ही ठेवली पाहिजे.

कोरोना हा अतिशय महाभयंकर व्हायरस गतीने पसरतो त्यामुळे आपण काळजी घेतली पाहिजे. माननीय प्रधानमंत्री व गोवा राज्याचे मुख्यमंत्री यांच्या आदेशानुसार कुणीही १४ एप्रिलपर्यंत  बाहेर जाऊ नये व कुणाच्या संपर्कात येऊ नये. वेळीच काळजी घेतली तर आमची यातून सुटका होईल. अगदी आपत्कालीन वेळ आलीच.., बाहेर जाण्याशिवाय मार्गच नाही तर मात्र तोंडाला मास्क वगैरे बांधून, हातात ग्लव्हज् घालून, कुठेही कुठल्याच ठिकाणी स्पर्श न करता,  आपली काळजी घ्यावी. कोरोनामुळे जगाच्या उलाढालीमध्ये आर्थिक, सामाजिक परिणाम झाले आहेत. पण या गोष्टींना तोंड देण्याशिवाय आपल्याकडे दुसरा मार्ग राहिलेला नाही. आज मंदिरे जरी बंद ठेवण्यात आली तरी देवाच्या रूपात डॉक्टर, नर्सेस, पोलीस, कोरोनापासून लोकांचा जीव वाचावा यासाठी आपल्या जीवनाशी झुंज देत आहेत.  तेसुध्दा कोणाचेतरी आई, वडील, भाऊ, बहीण, बायको, नवरा, मुलगा- मुलगी असतील याचा जरा विचार करा. आज त्यांचे काम आम्ही करू शकत नाही, निदान ते आम्ही वाढवूया नको.  केवळ जातीभेदाचा विचार न करता ङ्गक्त मनुष्यजात याला अनुसरून सेवा देणार्‍यांना माझा सलाम. म्हणून २२ मार्चला सायंकाळी पाच वाजता देशाबरोबर गोवेकरांनी सुध्दा शंख, ताट, थाळ्या वाजवून त्यांचा सन्मान केला.

आज इटालीच्या राष्ट्रपतीकडे रडण्याशिवाय दुसरा मार्ग नाही. वेगाने तिथल्या मनुष्यबळाचा अंत होतो आहे. ती परिस्थिची आपल्यावर येऊ नये म्हणून आम्ही योग्यप्रकारे काळजी घेतली पाहिजे. हॉस्पीटलमध्ये व्हेन्टीलेटर पण कमी आहेत. त्यामुळे इटालीतले डॉक्टर ६५ वयोगटातील लोकांचा वेनटीलेटर काडून २२-३० वयोगटातील तरूणांना लावतात. परिस्थिती खूप महाभयंकर आहे. काळजी घेण्यापलीकडे आपल्या हाती वेगळा मार्ग राहिलेला नाही. यावेळी सरकारी नियमांचे पालन करणे अतिशय गरजचे आहे. जनतेने आपल्याला घरातच लॉकडाऊन करून घेतले व आपल्या बरोबर जनतेची काळजी घेण्यास सहकार्य केले तर गोव्यात त्याची जास्त लागण होणार नाही हे निश्चीत.

कधी नाही ते शासन आपली सगळी राजकरणे बाजूला ठेवून कोरोनाशी लढायला तयार झालेला आहे. त्याला जनतेने साथ देण्याची गरज आहे. माणसाचे जीवन हे अधिक महत्वाचे ते जर सुरक्षित असेल तरच आपण पुढील पाऊले उचलू शकतो. शासन अगदी दररोज ओरडून ओरडून सांगतात- स्वतः बाहेर पडू नका, स्वतःला सेल्ङ्ग क्वारेनटाईन करून घ्या… त्याकडे कोण लक्षच देत नाही. तुम्हाला जीवनावश्यक ज्या काही गरजेच्या गोष्टी असतील त्या घरी पुरवल्या जातील. तरीही लोक बाजारात जाऊन गर्दी करतात, एकमेकांमध्ये सामाजिक अंतर ठेवायला सांगितले तरी लोक बेजबाबदारपणे वागतात. मला माहीत नाही.. लोक कधी शहाणे होतील ते ?   ……. शेवटी सांगते आम्ही जर घरी थांबलो, स्वतःबरोबर दुसर्‍यांचाही विचार केला तरच आम्ही आनंदाने, उत्साहाने जगू शकू व  आपल्याला पुढचे दिवस पाहायला मिळतील.