पर्वरीत रस्त्याजवळ सापडली मानवी हाडे!

0
13

पर्वरी पोलिसांना म्हापसा – पर्वरी मार्गावरील तिस्क क्रॉसिंग नजीकच्या सर्व्हिस रोडवर मानवी हाडे सापडली आहेत. कोणीतरी अज्ञात व्यक्तीने ती पिशवीतून तिथे टाकली असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काल बुधवारी (दि. 1) पर्वरी पोलीस स्थानकाला म्हापसा – पर्वरी मार्गावर मानवी हाडे असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर उपनिरीक्षक सीताराम मळीक यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. सदर हाडे विश्लेषण करण्यासाठी फॉरेन्सिक प्रयोगशाळेत पाठवली आहेत. विश्लेषणानंतर ती हाडे स्त्री किंवा पुरुषाची आहेत हे स्पष्ट होणार असल्याचे निरीक्षक अनंत गावकर यांनी सांगितले. निरीक्षक गावकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सीताराम मळीक अज्ञाताचा शोध घेत आहेत.