पर्यटक टॅक्सीला वाचवताना चिखलीत कदंबला अपघात

0
4

बसची कुंपणाला धडक, प्रवासी बचावले

कदंब मंडळाची बस प्रवाशांना घेऊन पणजीमार्गे वास्कोत येत असताना, दाबोळी चिखली वळणावर एका पर्यटक टॅक्सीला वाचवण्याचा प्रयत्नात कदंबला अपघात झाला. कदंबची कुंपणाला धडक बसून कदंबचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. मात्र या अपघातात सुदैवाने सर्व प्रवासी सुखरूप बचावले. कदंब बसचालकाने दाखवलेल्या हुशारीमुळे मोठा अपघात होण्यापासून बचाव झाला.

चिखली येथील आस्मा बारसमोर चुकीच्या दिशेने पार्क केलेल्या पर्यटक टॅक्सीमुळे हा अपघात झाला. या अपघातात कुठलीही जिवीतहानी झाली नाही. सदर कदंब बस इलेक्ट्रीक आहे.
कदंब परिवहन मंडळाची ही इलेक्ट्रीक बस पणजीमार्गे वास्कोत येताना, दाबोळी चिखली वळणावर चिखली वळणावर आस्मा बारसमोर पर्यटक टॅक्सी चुकीच्या दिशेने पार्क केली होती. तिथून ही टॅक्सी महामार्गावर चुकीच्या पद्धतीने आणत असतानाच आपल्या योग्य दिशेने कदंब बस येत होती. मात्र कदंब बसच्या चालकाने ऐनवेळी प्रसंगावधान दाखवत मोठ्या अपघातापासून बस व इतर वाहनांना वाचवले. कदंब चालकाने पर्यटक टॅक्सी चुकीच्या दिशेने बाहेर काढत असल्याचे पाहून त्वरित बस दुसऱ्या बाजूने वळवली. मात्र बसने आस्मा बारच्या संरक्षक भिंतीला धडक दिली. यामुळ कदंब बसचा पुढच्या आरशाचे व इतर ठिकाणचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे बसचे व बारचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

फर्मागुडीत कारला अपघात
कोने-फर्मागुडी येथे कार दरीत कोसळून अपघात झाल्याची घटना काल रविवारी पहाटे 3.30च्या सुमारास घडली. या अपघातात कारचालक किरकोळ जखमी झाला असून कारमध्ये चालक एकटाच होता. या घटनेत सदर कार (जीए 05 डी 8350) सुमारे 15 मीटर खोल दरीत कोसळली. ही कार फोंड्यातून माशेलच्या रस्त्याने जात होती. कोने येथे वळणावर कार पोहोचली असता चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले व कार दरीत कोसळली.