29.1 C
Panjim
Wednesday, October 20, 2021

पनामा ते पँडोरा

धनदांडग्यांच्या विदेशांतील बेनामी संपत्तीचा पर्दाफाश करणार्‍या पनामा पेपर्स, पॅराडाईज पेपर्सनंतर आता पँडोरा पेपर्सने जागतिक पातळीवर खळबळ माजवली आहे. ग्रीक पुराणकथांतील ‘पँडोराज् बॉक्स’ सर्वज्ञात आहे. इंटरनॅशनल कंझोर्टियम ऑफ इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिस्टस् म्हणजेच ‘आयसीआयजे’ अंतर्गत जगभरातील १५० वर्तमानपत्रांमधील सहाशे पत्रकारांनी ११.९ दशलक्ष कागदपत्रांची अथक छाननी करून अशाच प्रकारचे एक पँडोराज् बॉक्स खुले करीत अब्जावधींची करबुडवेगिरी उजेडात आणली आहे. यापूर्वीही अशाच प्रकारे गोपनीय माहितीची छाननी करून जगभरातील बड्या धेंडांची विदेशी संपत्ती वेळोवेळी उजेडात आणली गेली. त्यामुळे आता ह्यात नावीन्य उरलेले नाही. फक्त यावेळी उजेडात आलेली सचिन तेंडुलकरसारखी नावे धक्कादायक आहेत एवढेच. अर्थात, विदेशांमध्ये कंपन्या स्थापन करून व्यवसाय करणे हे बेकायदेशीर नाही. फक्त त्या कंपन्यांचा वापर येथील अवैध संपत्ती दडवण्यासाठी केला गेला आहे का, करबुडवेगिरीसाठी केला गेला आहे का हे तपासणे महत्त्वाचे ठरते. यापूर्वीच्या पनामा पेपर्सच्या गौप्यस्फोटात गोव्यापर्यंतच्या व्यक्तींची नावे आली होती. यापैकी कितीजणांवर कारवाई झाली? केंद्र सरकारने आता प्रस्तुत पँडोरा पेपर्समध्ये उजेडात आलेल्या प्रकरणांचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी मल्टीएजन्सी तपासणीची घोषणा केलेली आहे. म्हणजे आयकर खाते, सक्तवसुली संचालनालय, महसुली गुप्तचर यंत्रणा आणि रिझर्व्ह बँकेच्या संयुक्त पथकाद्वारे या प्रकरणांची सत्यासत्यता तापसली जाणार आहे. मोदी सरकार सत्तेवर आले तेच विदेशातील काळ्या पैशाला भारतात आणण्याचा वायदा करून. सत्तेवर आल्या आल्या मोदी सरकारने विदेशातील काळ्या पैशाविरुद्ध नवा कायदा आणला. पनामा आणि पॅराडाईज पेपर्स प्रकरणांतून बाहेर आलेल्या माहितीच्या तपासणीअंती वीस हजार कोटींची संपत्ती आजवर जप्त करण्यात आली असल्याचा सरकारचा दावा आहे. परंतु करबुडव्यांकडून दंडासह करवसुलीखेरीज कोणाविरुद्ध अटकेची फौजदारी कारवाई झाल्याचे फारसे दृष्टिपथात नाही. त्यामुळेच आजवर एवढी मोठमोठी प्रकरणे उजेडात आलेली असूनही धनदांडगी मंडळी विदेशांत आपली संपत्ती दडविण्यासाठी नानाविध नवनव्या क्लृप्त्या योजण्यास कचरत नाहीत हे आश्चर्यकारक आहे. भारतातील ३६० व्यक्तींची नावे ह्या यादीत आहेत, परंतु ह्यापैकी कितीजणांवर विदेशी उत्पन्न (अघोषित विदेशी उत्पन्न व मालमत्ता) कायद्याखाली कारवाई होणार?
अशा गौप्यस्फोटांनंतर जगभरामध्ये क्षणिक हालचाल होते, परंतु नंतर पुन्हा ‘येरे माझ्या मागल्या’ म्हणतात त्याप्रमाणे आर्थिक हेराफेरीचे प्रकार सुखेनैव सुरू राहतात. प्रस्तुत पँडोरा पेपर्स अंतर्गत बारा दशलक्ष कागदपत्रांच्या मंथनातून विदेशांतील चौदा ठिकाणच्या २९ हजार कंपन्या आणि ट्रस्टस्‌चा काळा कारभार समोर आलेला आहे. पनामा, दुबई, मोनॅको, स्वित्झर्लंड, कॅमेन आयलंड, ब्रिटीश व्हर्जिन आयलंड अशी करबुडवेगिरीची कुख्यात ठिकाणे अजूनही अशा बोगस कंपन्या आणि ट्रस्टस्‌च्या स्वागतास उत्सुकच दिसतात, हाच ह्या गौप्यस्फोटाचा अर्थ आहे. पनामा पेपर्समध्ये नवाज शरीफपासून व्लादिमीर पुतीनपर्यंत बड्या बड्या नेत्यांची नावे आली होती. नवाज शरीफांना त्यामुळे राजीनामा द्यावा लागला होता. परंतु आता पुन्हा ह्या पॅँडोरा पेपर्समध्येही अनेक जागतिक नेते आणि राष्ट्रप्रमुखांची यादी दिसतेच आहे. टोनी ब्लेअरपासून पुतीनपर्यंतची नावे यातही दिसतात. ज्या पाकिस्तानच्या पंतप्रधानाला पदच्युत व्हावे लागले, तेथील अनेक मंत्री आणि नेते, लष्करशहा यांची नावे पुन्हा दिसतात. याचा अर्थ काय होतो? असे कितीही गौप्यस्फोट जरी होत राहिले तरी आमचे कोणी काही वाकडे करू शकत नाही, ही उद्दाम आणि उन्मत्त वृत्तीच यातून प्रकट होते आहे. उलट आर्थिक हेराफेरीचे नवनवे मार्ग ह्या मंडळींनी शोधून काढलेले दिसत आहेत. विदेशांतील मालमत्तांपासून महागड्या पेंटिंग्जपर्यंत नानाविध माध्यमांतून अब्जावधींचा काळा पैसा कसा दडवून ठेवला जात आहे हे पाहून सामान्यांचे डोळे जरूर विस्फारतील, परंतु जे लोक ह्यात गुंतलेले आहेत, त्यांना जणू यात विशेष काही नाही एवढ्या सहजपणे ह्या गैरप्रकारांमध्ये ते गुंतलेले दिसत आहेत. पँडोरा पेपर्स हा २.९४ टेर्राबाईटचा अशा प्रकारचा आजवरचा सर्वांत मोठा गौप्यस्फोट आहे हे खरे आहे, परंतु या सार्‍या मंथनाची फलनिष्पत्ती काय हा यातला मोलाचा प्रश्न आहे. भारतात सरकारने भले कारवाईची ग्वाही दिलेली आहे, परंतु जे लोक यात गुंतलेले आहेत त्यांची पोहोच लक्षात घेतली तर खरेच हे लोक खडी फोडायला जातील का ह्याबाबतचा जनतेचा विश्वासच आजवरच्या दाहक अनुभवाने पार उडालेला आहे.

STAY CONNECTED

847FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

प्रश्न खड्‌ड्यांचा

रस्त्यांना पडलेल्या खड्‌ड्यांवरून आणि नव्याने बांधकाम होत असलेल्या महामार्गांच्या दुर्दशेवरून विरोधकांनी काल राज्य विधानसभेत सरकारला घेरले. राज्यातील रस्त्यांच्या दुरवस्थेसंबंधी आम्हीही वेळोवेळी आवाज...

खराब महामार्गामुळे विधानसभेत गदारोळ

>> कंत्राटदाराला नोटीस पाठवल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती पत्रादेवी ते काणकोण या सहापदरी राष्ट्रीय महामार्गाच्या निकृष्ट कामावरून काल विधानसभेत विरोधकांनी गोंधळ...

भंडारी समाजाला ओबीसीच्या कोट्यातून आरक्षण नाही

>> पालयेकर यांचा विधानसभेत आरोप ओबीसीसाठी जे आरक्षण आहे त्या कोट्यातून भंडारी समाजाला जेवढे आरक्षण मिळायला हवे तेवढे ते...

नोकरभरतीसाठी कंत्राटी कामगारांना प्राधान्य देण्याची खंवटेंची मागणी

विविध सरकारी खात्यांत नव्याने नोकरभरती करण्यापूर्वी त्या त्या खात्यांत गेल्या कित्येक वर्षांपासून कंत्राटी पद्धतीवर काम करणार्‍या कर्मचार्‍यांना अगोदर सेवेत कायम केले जावे,...

भारतात कोरोनाचे ९९ कोटी लसीकरण

>> केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती भारतात १६ जानेवारीपासून सुरू करण्यात आलेल्या लसीकरण मोहिमेने काल तब्बल ९९ कोटींचा टप्पा गाठला...

ALSO IN THIS SECTION