पणजी महापौरपदी पुन्हा मडकईकरच

0
119

>> उपमहापौरपदी अशोक आगशीकर शक्य

येथील पणजी महानगरपालिकेच्या महापौरपदी उदय मडकईकर यांची फेरनिवड केली जाणार आहे. तर, उपमहापौरपदी नगरसेवक वसंत अशोक आगशीकर यांची वर्णी लागणार आहे.

पणजी महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौरपदाचा एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होत आहे. गुरुवार १२ मार्च २०२० रोजी महापौर व उपमहापौरपदासाठी निवडणूक घेतली जाणार आहे. या दोन्ही पदांसाठी बुधवार ११ मार्चला दुपारी १ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात यांनी महानगरपालिकेच्या दोन्ही पदांसाठी उमेदवार निश्‍चित केले आहेत.
आमदार मोन्सेरात यांनी आपले समर्थक विद्यमान महापौर उदय मडकईकर यांची महापौरपदासाठी फेरनिवड केली आहे. तर, उपमहापौरपदी भाजपचे नगरसेवक वसंत आगशीकर यांची निवड केली आहे.

महानगरपालिकेत भाजपचे सर्वाधिक नगरसेवक असल्याने दोन्ही पदांची निवड बिनविरोध केली जाणार आहे. विद्यमान पणजी महानगरपालिका मंडळाला चार वर्षे पूर्ण होत असून मार्च २०२१ मध्ये महानगरपालिका मंडळासाठी निवडणूक होणार आहे.