पणजीत दोन दिवसांत 4 इंच पावसाची नोंद

0
7

पणजी परिसरात सुमारे 2 इंच अवकाळी पावसाची काल नोंद झाली. मागील दोन दिवसात पणजी परिसरामध्ये अंदाजे 4 इंच पावसाची नोंद झाली आहे. तर, वाळपई येथे 2 इंच आणि काणकोण येथे 1 इंच पावसाची नोंद झाली आहे. म्हापसा, पेडणे, जुने गोवा या भागात पावसाची नोंद झाली आहे.

अवकाळी पावसामुळे कमाल तापमानात काही प्रमाणात घट झाली आहे. चोवीस तासांत पणजी येथे कमाल तापमान 33.2 अंश सेल्सिअस आणि मुरगाव येथे 34.2 अंश सेल्सिअस एवढे नोंद झाले आहे. येत्या चोवीस तासांत कमाल तापमान 33 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. तर, पुढील अठ्ठेचाळीस तासात कमाल तापमान 34 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. तसेच, 21 व 22 मे रोजी राज्यातील काही भागात पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

राज्यात मागील चोवीस तासांत मुरगाव येथे सर्वाधिक 2.68 इंच, पणजी येथे 2.18 इंच, वाळपई येथे 1.51 इंच, मडगाव येथे 1.46 इंच, म्हापसा येेथे 1.02 इंच, दाबोळी येथे 1.01 इंच, काणकोण येथे 0.83, साखळी येथे 0.57 इंच, फोंडा येथे 0.55 इंच, पेडणे येेथे 0.48 इंच अशा पावसाची नोंद झाली. केपे आणि सांगे भागात अवकाळी पावसाचे प्रमाण तूर्त कमी आहे.