पणजीतील वाहतूक कोंडी; आराखडा 14 जुलैपूर्वी द्या

0
3

मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने राजधानी पणजीतील वाहतूक कोंडी आणि गैरव्यवस्थापन प्रश्नी नोडल अधिकारी म्हणून राज्याच्या वाहतूक सचिवांची नियुक्ती काल केली. सोबतचपणजीतील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्याबाबतचा तात्पुरता वाहतूक आराखडा येत्या 14 जुलैपूर्वी प्रतिज्ञापत्राद्वारे सादर करण्याचे निर्देश दिले. गोवा खंडपीठाने पणजी शहर व परिसरातील वाहतूक कोंडी आणि गैरव्यवस्थापन प्रश्नी स्वेच्छा याचिका दाखल करून घेतली आहे.