न्यूझीलंड पुरुष क्रिकेट संघही एकांतवासात

0
132

कोरोना विषाणूच्या भीतीमुळे ऑस्ट्रेलिया दौरा अर्धवट सोडून मायदेशी परतलेल्या न्यूझीलंडच्या पुरुष क्रिकेट संघ मायदेशात विलगीकरणाला सामोरा जात आहे. संपूर्ण संघाला आणि सहाय्यक स्टाफला १४ दिवस अनिवार्य अशा एकांतवासात ठेवण्यात आले आहे.
एका संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा अर्डेन यांनी काल दिलेल्या एका आदेशानुसार सीडनीवरून परतलेल्या राष्ट्रीय पुरुष क्रिकेट संघातील १५ खेळाडूंना आणि सपोर्ट स्टाफला घरातच राहण्यासा सांगितले आहे.

एनजेडीसीचे लोेक संपर्क व्यवस्थापक बूक यांनी दिलेल्या माहितीनुसार, न्यूझीलंड संघ आणि सपोर्ट स्टाफ यांना सध्या इतरांपासून विलग ठेवण्यात आले आहे. स्व-विलगीकरण काय असते याबाबत त्यांना माहिती देण्यात आली असून त्याचे ते पालन करीत आहेत.