निवडणूक जाहीर झाल्यानंतर भाजपच्या उमेदवारांची घोषणा

0
6

आगामी 2024 च्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांच्या नावाची घोषणा लोकसभेची निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर केली जाणार आहे, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी काल भाजप मुख्यालयात ‘मेरा बुथ, सबसे मजबूत’ या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले. आगामी लोकसभा निवडणुकीत उत्तर आणि दक्षिण गोवा या दोन्ही मतदारसंघातून भाजपचे उमेदवार बहुमतांनी निवडून येतील. भाजपने दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघावर जास्त भर दिला असून, भाजपचा उमेदवार सुमारे 30 हजार मताधिक्याने निवडून येईल, असा दावाही तानावडे यांनी केला.