नागरिकांच्या विनंतीनुसार भाजपमध्ये प्रवेश : फळदेसाई

0
11

नागरिकांच्या विनंतीनुसार मतदारसंघाच्या विकासासाठी भाजपमध्ये प्रवेश केला आहे, असा दावा कॉंग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेले कुंभारजुवेचे आमदार राजेश फळदेसाई यांनी काल पत्रकारांशी बोलताना केला. विरोधी कॉंग्रेस पक्षात असल्याने मतदारसंघाच्या विकासकामांमध्ये अडचणी निर्माण होत होत्या.

आता, सत्ताधारी गटात असल्याने मतदारसंघातील विकासकामे मार्गी लावण्यास चालना मिळणार आहे, असेही फळदेसाई यांनी सांगितले. जुने गोवा येथील वारसा स्थळातील बेकायदा बांधकामावर कारवाईच्या कामाला आता गती प्राप्त होणार आहे. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्यासमवेत सदर वादग्रस्त बांधकामाच्या विषयावर चर्चा करणार आहे, असेहीत्यांनी सांगितले. आम्ही देवालय व इतर धार्मिक स्थळात जाऊन पक्षांतर न करण्याची शपथ घेतली होती. तथापि, नागरिकांच्या मागणीवरून मतदारसंघाच्या विकासासाठी भाजपमध्ये प्रवेश केला आहे, असेही त्यांनी संबंधित प्रश्‍नावर बोलताना सांगितले.